Agriculture Agricultural News agitation of agriculture students for demands pune maharashtra | Agrowon

पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मागण्यांसाठी आंदोलन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार कायम खुले ठेवण्याबरोबरच, सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात यावेत, ग्रंथालय २४ तास सुरू ठेवावे, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेतसाठी नरवीर तानाजी वाडीचा रस्ता कायमस्वरूपी सुरू ठेवावा आदी मागण्यांसाठी पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी मंगळवारी (ता. २१) सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. कुलगुरूंनी स्वतः चर्चेसाठी यावे या मागणीवर विद्यार्थ्यां ठाम होते. 

पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार कायम खुले ठेवण्याबरोबरच, सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात यावेत, ग्रंथालय २४ तास सुरू ठेवावे, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेतसाठी नरवीर तानाजी वाडीचा रस्ता कायमस्वरूपी सुरू ठेवावा आदी मागण्यांसाठी पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी मंगळवारी (ता. २१) सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. कुलगुरूंनी स्वतः चर्चेसाठी यावे या मागणीवर विद्यार्थ्यां ठाम होते. 

दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एन. रसाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी कुलगुरूंशीच चर्चा करण्यावर ठाम होते. दुपारी अधिष्ठाता डॉ. ए. एल. फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र तरी देखील विद्यार्थी कुलगुरूंबरोबरच चर्चेवर ठाम राहिल्याने, अखेर महाविद्यालय प्रशासनाने कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा यांच्याशी संपर्क साधला. यानंतर दुपारी कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा राहुरी येथून पुण्याकडे येण्यास निघाल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

या आहेत प्रमुख मागण्या

  • विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे प्रशासन तातडीने बदलावे. 
  • द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहलीचे पैसे तातडीने खात्यात जमा व्हावेत. 
  • विद्यावेतन तातडीने मिळावे. 
  • ग्रंथालय २४ तास सुरू राहावे. 
  • विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी नरवीर तानाजी वाडीचा रस्ता कायमस्वरूपी सुरू ठेवावा. 
  • विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात यावेत. 
  • मुलींच्या वसतिगृहाच्या कामाला गती मिळावी. 
  • विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार कायम खुले असावे. 
  • महाविद्यालयाचे मैदान भाडेतत्त्वावर देऊ नये.

इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...