सांगलीत दूध रस्त्यावर ओतून, सरकारचा निषेध करीत आंदोलन

सांगली : सरकार विरोधात घोषणा देत गायीच्या दुधास प्रतिलिटर १० रुपये अनुदान व प्रतिलिटर ३० रुपये भाव तसेच दूध पावडरसाठी ५० रुपये अनुदानद्यावे, या मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) महायुतीच्या वतीने दूध आंदोलन करण्यात आले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  : ‘सरकारची माया आटली, दूध उत्पादकांच्या हाती राहिली भावाची रिकामी किटली’, ‘निष्क्रिय व तिघाडी राज्यकर्त्यांचा धिक्कार असो’, अशा सरकार विरोधात घोषणा देत गायीच्या दुधास प्रतिलिटर १० रुपये अनुदान व प्रतिलिटर ३० रुपये भाव तसेच दूध पावडर निर्यातीस ५० रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) महायुतीच्या वतीने दूध आंदोलन करण्यात आले. इस्लामपूर येथे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतले. दरम्यान, सागर खोत यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

गायीच्या दुधाचे दर कमी झाले असल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे गाईच्या दूध दरात वाढ झाली पाहिजे, या मागणीसाठी महायुतीने जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासूनच आंदोलनाला सुरुवात केली. इस्लामपूर येथे रयत क्रांतीच्या आंदोलनावेळी संघटनेचे सागर खोत यांना पोलिसांनी अटक केली.

शिराळा तालुक्यात भाजपच्या नेत्यांनी सरकार विरोधात घोषणा देऊन त्यांचा निषेध केला. आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समवेत कार्यकर्ते गायी घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आटपाडी- पंढरपूर रस्ता अडवला होता.

यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनाची तीव्रता वाढू लागली. अनेक ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या अडवून कॅनमधील दूध रस्त्यावर ओतले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com