Agriculture Agricultural News agitation for milk rate issue Sangli Maharashtra | Agrowon

सांगलीत दूध रस्त्यावर ओतून, सरकारचा निषेध करीत आंदोलन

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सांगली  :  सरकार विरोधात घोषणा देत गायीच्या दुधास प्रतिलिटर १० रुपये अनुदान व प्रतिलिटर ३० रुपये भाव तसेच दूध पावडरसाठी ५० रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) महायुतीच्या वतीने दूध आंदोलन करण्यात आले.

सांगली  : ‘सरकारची माया आटली, दूध उत्पादकांच्या हाती राहिली भावाची रिकामी किटली’, ‘निष्क्रिय व तिघाडी राज्यकर्त्यांचा धिक्कार असो’, अशा सरकार विरोधात घोषणा देत गायीच्या दुधास प्रतिलिटर १० रुपये अनुदान व प्रतिलिटर ३० रुपये भाव तसेच दूध पावडर निर्यातीस ५० रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) महायुतीच्या वतीने दूध आंदोलन करण्यात आले. इस्लामपूर येथे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतले. दरम्यान, सागर खोत यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

गायीच्या दुधाचे दर कमी झाले असल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे गाईच्या दूध दरात वाढ झाली पाहिजे, या मागणीसाठी महायुतीने जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासूनच आंदोलनाला सुरुवात केली. इस्लामपूर येथे रयत क्रांतीच्या आंदोलनावेळी संघटनेचे सागर खोत यांना पोलिसांनी अटक केली.

शिराळा तालुक्यात भाजपच्या नेत्यांनी सरकार विरोधात घोषणा देऊन त्यांचा निषेध केला. आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समवेत कार्यकर्ते गायी घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आटपाडी- पंढरपूर रस्ता अडवला होता.

यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनाची तीव्रता वाढू लागली. अनेक ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या अडवून कॅनमधील दूध रस्त्यावर ओतले.
 


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...