Agriculture Agricultural News agitation for milk rate issue Solapur Maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलन 

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सोलापूर  ः दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या एल्गार आंदोलनाची सुरुवात शनिवारी (ता.१) पंढरपुरातून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी श्री विठ्ठलाला आणि रासपचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी चंद्रभागा नदीला दुग्धोभिषेक करीत केली.

सोलापूर  ः दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या एल्गार आंदोलनाची सुरुवात शनिवारी (ता.१) पंढरपुरातून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी श्री विठ्ठलाला आणि रासपचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी चंद्रभागा नदीला दुग्धोभिषेक करीत केली. तत्पूर्वी मध्यरात्रीच पंढरपूर-सातारा, पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर रस्त्यावर टायर जाळून सरकार विरोधी घोषणा देत ‘रयत’च्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. त्याशिवाय शनिवारी जिल्ह्यातील तिसंगी, वाघोली, पेनूर येथेही आंदोलन झाले. त्यात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले, तर कुठे ग्रामदैवतांना दुग्धाभिषेक करून लक्ष वेधले. 

माजी मंत्री खोत यांनी सकाळी आठच्या सुमारास पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिराबाहेरील संत नामदेव पायरीजवळ विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करीत सरकारविरोधी जोरदार घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रणव परिचारक, बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनीही पंढरपुरात चंद्रभागा नदीला दुग्धाभिषेक करुन लक्ष वेधले. दूध दरवाढीसाठी या दोन्ही माजी मंत्र्यांनी अशा पद्धतीने श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे घातले.  

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री पंढरपूर- सातारा महामार्गावर आणि पंढरपूर-मंगळवेढा महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. त्याशिवाय शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात विविध भागात हे आंदोलन सुरुच राहिले. सकाळी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे कार्यकर्त्यांनी स्वतः दुधाने आंघोळ करत रस्त्यावर दूध ओतले.

मोहोळ तालुक्यातील पेनूर, वाघोलीतही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. वाघोली गावातील श्री महादेव मंदिरात पिंडीला दुग्धाभिषेक करत लक्ष वेधले. त्याशिवाय जिल्ह्यातील अनेक भागांत दिवसभर हे आंदोलन सुरुच होते. काही गावात दूध संस्थानी स्वतःहून दूध संकलन बंद ठेवले. काही गावात शेतकऱ्यांनी बकरी ईद सणामुळे मुस्लिम बांधवांना दूध वाटून अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले. 
 
‘एक मुका, एक बहिरा अन् एक आंधळा’
राज्यामध्ये रोज १ कोटी २० लाख लिटर दुधाचे संकलन होते. ६० लाख लिटर दूध पिशवी बंदमध्ये विक्री होत आहे. ५० लाख लिटर दूध अतिरिक्त असून, त्याची दूध भुकटी तयार केली जाते. सध्या गाईच्या दुधाला २० रुपये लिटर भाव आहे. फडणवीस सरकारने दूध उत्पादकांना ५ रुपये थेट अनुदान दिले, भुकटीला ५० रुपये निर्यात अनुदान दिले. याच धर्तीवर सरकारने दूध उत्पादकांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे आणि दूध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान द्यावे, अशी मागणी माजी मंत्री खोत यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

पण सध्याचे तीन पक्षाचे सरकार आहे, कोणाचा पायपोस कोणाला नाही, हे तिन्ही पक्ष म्हणजे एक मुका, एक बहिरा आणि एक आंधळा आहे, मग कारभार कसा होणार, अशी टीकाही खोत यांनी केली.

 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...