Agriculture Agricultural News agitation of political parties Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरात भाजपच्या आंदोलनाविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादीचेही आंदोलन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

सोलापूर  ः राज्यात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे, याचा निषेध म्हणून सोलापुरात शुक्रवारी (ता.२२) भाजपच्या वतीने माझे अंगण, माझे रणांगण म्हणत घराच्या अंगणात काळ्या फिती दाखवत नेते, कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. दुसरीकडे या आंदोलनाला विरोध करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही भगवे झेंडे दाखवत सरकारच्या कामाला पाठिंबा दर्शवला.

सोलापूर  ः राज्यात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे, याचा निषेध म्हणून सोलापुरात शुक्रवारी (ता.२२) भाजपच्या वतीने माझे अंगण, माझे रणांगण म्हणत घराच्या अंगणात काळ्या फिती दाखवत नेते, कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. दुसरीकडे या आंदोलनाला विरोध करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही भगवे झेंडे दाखवत सरकारच्या कामाला पाठिंबा दर्शवला.

माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह त्यांच्या निवासस्थानी हे आंदोलन केले. तर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी महापौर निवासस्थानी परिवारासह हे आंदोलन केले. आमदार देशमुख, महापौर यन्नम यांनी सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करताना सरकार कोरोनाला अटकाव करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. रुग्णसंख्या वरचेवर वाढतच आहे, पण सरकार गंभीर नसल्याचे सांगितले.

दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बरडे यांनीही कार्यकर्त्यांसह अवंती नगर येथील आपल्या निवासस्थानी भगवे झेंडे उंचावत सरकारला पाठिंबा दर्शवत भाजपचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, संतोष पवार यांनी पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे झेंडे दाखवून भाजपचा निषेध केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या या आंदोलनाची लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. पण त्याहीपेक्षा राजकारण्यांच्या या पावित्र्यामुळे सर्वांनी करमणूक म्हणूनच याकडे पाहिल्याचे दिसले.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...