Agriculture Agricultural News agriculture alumni collect fund for fight against corona Akola maharashtra | Agrowon

‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मदतीचा ओघ सुरुच

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईला पाठबळ देण्यासाठी आर्थिक मदत सुरु ठेवली आहे. एए सिरीजच्या माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दोन लाख २२ हजार २२२ रुपयांची मदत केली आहे.

अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईला पाठबळ देण्यासाठी आर्थिक मदत सुरु ठेवली आहे. एए सिरीजच्या माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दोन लाख २२ हजार २२२ रुपयांची मदत केली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या अकोला कृषी महाविद्यालय, नागपूर कृषी महाविद्यालय, अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, वनविद्या महाविद्यालय, कृषी तांत्रिकी महाविद्यालय अकोला येथील या सीरिजच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी दोन लाख २२ हजार २२२ रुपये जमा केले. आतापर्यंत सर्व आजीमाजी विद्यार्थ्यांनी मिळून जवळपास २५ लाख जमा केले आहेत.

याबद्दल पालकमंत्री बच्चू कडू, आमदार रोहित पवार, नितीन देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सिने कलावंत भारत गणेशपुरे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्यासह सर्व संचालकांनी माजी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचीही मदत
‘कोरोना’विरुद्ध उपाययोजनांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकीच्या दहा विद्यार्थ्यांनी एक लाख रुपयांचा निधी जमा केला. हा निधी नुकताच मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यात आल्याची माहिती डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...
एकरकमी ‘एफआरपी’चे वाटप कोल्हापुरात...कोल्हापूर  : जिल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा...
पूर्णवेळ कृषी सहसंचालकाची प्रतीक्षापुणे : पुणे विभागीय कृषी सहसंचालकाची जबाबदारी...
सांगलीत तीनशे सौर कृषिपंप सुरूसांगली  : वीजपुरवठा नसतानाही दिवसा पिकांना...
ऊसदर आंदोलनाची रणभूमी कऱ्हाड राहीलसातारा : ऊसदरासह इतर प्रश्‍नांवर चर्चा...
रब्बीसाठी ‘वान’चे पाणी देण्याची...बुलडाणा : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान...
सातारा जिल्ह्यात ‘एफआरपी’चा प्रश्‍न...कऱ्हाड  : साखर कारखान्यांत ऊस गाळप...
काटेपूर्णाच्या कालव्यांची दुरुस्ती...अकोला : यंदाच्या रब्बी हंगामासाठी काटेपूर्णा...
धान खरेदीवरून गृहमंत्र्यांनी...नागपूर  : गोंदिया जिल्हात धान खरेदी...
बुलडाण्यात दोन कोटींची नुकसान भरपाईबुलडाणा  : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या...
शासकीय खरेदीअभावी उत्पादकांची लूटआरेगाव, जि. यवतमाळ  : आज ना उद्या शासन...
यवतमाळमध्ये पन्नास हजार क्विंटल कापूस...यवतमाळ : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या सीसीआय...
‘द्वारकधीश’कडून पंधरवड्यात ५५ हजार टन...नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश...
`ऊर्जामंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा...नाशिक : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ३...
किनवट येथे धानाचे खरेदी केंद्र मंजूरनांदेड : धान खरीप पणन हंगाम २०२० - २१ साठी...
‘इसापूर’चे पहिले आवर्तन शुक्रवारपासूननांदेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूरमधून...
खानदेशात मका, ज्वारीला हमीभाव मिळेना जळगाव : खानदेशात ज्वारी, मक्याची आवक बाजारात सुरू...
परभणी जिल्ह्यात तीस हजार हेक्टर ऊस...परभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये लागवड...