सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर ःज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर (वय ६५) यांचे मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.
अपर्णा रामतीर्थकर

अपर्णाताईंनी मुलाचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळले. मुलगा स्वावलंबी होताच १९९६ मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बीएची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही, असं ठरवलं. त्यानंतर अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या.

२००१ पासून त्या सामाजिक कार्यात होत्या. २००८ पासून ‘चला नाती जपू या, आईच्या जबाबदाऱ्या’या विषयांवर त्यांनी तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली. तुटणारी घरं वाचली पाहिजेत यासाठी त्या कार्य करीत होत्या. महिन्यातून २६ ते २८ दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणाऱ्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयांवर त्यांनी सातत्याने स्तंभलेखन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com