ठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात मागील 30 वर्षांचे मित्र शिवसेना-भाजप सोमवारी (ता. १६) विरोधक म्हणून एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. थेट मुख्यमंत्री झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच कारकिर्दीत चर्चेत राहिलेल्या प्रश्‍नांवरून हल्ला चढवणार असल्याची चिन्हे आहेत. ठाकरे सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे.   

राज्यात सरकार स्थापन होण्यात विलंब लागल्यामुळे नागपूर अधिवेशन कमी कालावधीचे घेण्यात आले असून, १६ ते २१ दरम्यान कालावधीत पार पाडले जाणार आहे. प्रश्‍नोत्तराच्या कामकाजाला फाटा देऊन इतर कामकाज उरकले जाणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ ठाकरे यांनी घेतल्यास जेमतेम १७-१८ दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे विरोधी बाकावरून राज्यातील जनतेच्या हिताच्या प्रश्‍नावरून हल्ला होईल, तो हल्ला कसा परतावून लावतात याची चुणूक या अधिवेशनात पाहायला मिळू शकते.

सरकारतर्फे जमेची बाजू म्हणजे मुख्यमंत्री वगळता शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना विधिमंडळ कामकाजाचा तगडा अनुभव आहे. सध्या राज्य सरकारच्यावतीने विविध विभागांचा आढावा घेणे सुरू आहे. राज्यातील पायाभूत प्रकल्पांना निधी कमी पडू न देणे हे सरकारपुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. राज्यावर सुमारे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. या संधीचा भाजप नक्‍कीच लाभ उठवणार आहे. नवख्या मुख्यमंत्र्यांना भांबावून सोडण्याची रणनीती भाजप अवलंबणार असल्याचे समजते.    सरकारपुढील आव्हाने 

  • शेतकरी कर्जमाफी, सात-बारा कोरा करणे 
  • अवकाळीमुळे पिकांचे झालेले नुकसान, त्याची भरपाई देणे 
  • अनुभवी आणि भक्‍कम विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा सामना करणे 
  • केवळ सहा मंत्री विरोधकांचा सामना करणार 
  • मुख्यमंत्री ठाकरे संसदीय कामकाजात नवखे आहेत
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com