`कुकडी'च्या आवर्तनासाठी रस्त्यावर उतरू : बबनराव पाचपुते

श्रीगोंदे, जि. नगर : ‘कुकडी' लाभक्षेत्रातील श्रीगोंद्यासह शेवटच्या भागात उशीरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन तालुक्‍यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ‘कुकडी'च्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. ‘कोरोना’च्या संकटामुळे शांत बसावे लागत आहे, म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याबाबत पुन्हा अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.
संग्रहित छायाचित्र

‘कुकडी'च्या उन्हाळी आवर्तनाबाबत श्री. पाचपुते यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवून शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यात पाचपुते यांनी म्हटले आहे, की उन्हाळी हंगामासाठी येडगाव धरणात पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी डिंभे डावा कालवा सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. माणिकडोह धरणातून नदीद्वारे फीडिंग सुरू करावे. घोड, कुकडी नदीवरील बंधाऱ्याच्या आवर्तनासाठी एक महिना पुरेल, म्हणजे २५ टक्के पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा. धरण क्षेत्रात एक जूनला पाऊस सुरू होतो, हे गृहित धरून माणिकडोह धरणातील अर्धा टीएमसी, पिंपळगाव धरणाचे अडीच टीएमसी व डिंभे धरणातून डाव्या कालव्याद्वारे सतत पाणी सोडण्याचा आदेश दिला, तर हे आवर्तन होईल. तातडीने आवर्तन सुरू झाल्यास पिण्याच्या पाण्याचे आरक्षण असलेल्या ‘कुकडी' डाव्या कालव्यावरील सर्व उद्‌भवांना पाणी उपलब्ध होऊ शकेल.

पिंपळगाव जोगे कालवा त्यासाठी त्वरित सुरू करावा. उन्हाळी आवर्तन अत्यंत गरजेचे असून, ‘कुकडी' डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांनी आतापर्यंत जगविलेली पिके धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना या संकटात शासनाने मदतीचा हात देऊन तातडीने आवर्तन सोडावे; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा श्री.पाचपुते यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com