Agriculture Agricultural News Babanrao pachpute demand to release water rotation Nagar Maharashtra | Page 3 ||| Agrowon

`कुकडी'च्या आवर्तनासाठी रस्त्यावर उतरू : बबनराव पाचपुते

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

श्रीगोंदे, जि. नगर  : ‘कुकडी' लाभक्षेत्रातील श्रीगोंद्यासह शेवटच्या भागात उशीरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन तालुक्‍यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ‘कुकडी'च्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. ‘कोरोना’च्या संकटामुळे शांत बसावे लागत आहे, म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याबाबत पुन्हा अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.

श्रीगोंदे, जि. नगर  : ‘कुकडी' लाभक्षेत्रातील श्रीगोंद्यासह शेवटच्या भागात उशीरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन तालुक्‍यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ‘कुकडी'च्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. ‘कोरोना’च्या संकटामुळे शांत बसावे लागत आहे, म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याबाबत पुन्हा अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.

‘कुकडी'च्या उन्हाळी आवर्तनाबाबत श्री. पाचपुते यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवून शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यात पाचपुते यांनी म्हटले आहे, की उन्हाळी हंगामासाठी येडगाव धरणात पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी डिंभे डावा कालवा सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. माणिकडोह धरणातून नदीद्वारे फीडिंग सुरू करावे. घोड, कुकडी नदीवरील बंधाऱ्याच्या आवर्तनासाठी एक महिना पुरेल, म्हणजे २५ टक्के पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा. धरण क्षेत्रात एक जूनला पाऊस सुरू होतो, हे गृहित धरून माणिकडोह धरणातील अर्धा टीएमसी, पिंपळगाव धरणाचे अडीच टीएमसी व डिंभे धरणातून डाव्या कालव्याद्वारे सतत पाणी सोडण्याचा आदेश दिला, तर हे आवर्तन होईल.
तातडीने आवर्तन सुरू झाल्यास पिण्याच्या पाण्याचे आरक्षण असलेल्या ‘कुकडी' डाव्या कालव्यावरील सर्व उद्‌भवांना पाणी उपलब्ध होऊ शकेल.

पिंपळगाव जोगे कालवा त्यासाठी त्वरित सुरू करावा. उन्हाळी आवर्तन अत्यंत गरजेचे असून, ‘कुकडी' डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांनी आतापर्यंत जगविलेली पिके धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना या संकटात शासनाने मदतीचा हात देऊन तातडीने आवर्तन सोडावे; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा श्री.पाचपुते यांनी दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम;...रत्नागिरी  ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर सांगली  : जिल्ह्यात बुधवार (ता. ८)...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातच २९...परभणी : सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे...
दापोली, मंडणगडमधील ५८५० हेक्टर क्षेत्र...रत्नागिरी  ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
रताळे लागवडीसाठी सुधारित जातीरताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
टप्प्याटप्प्याने करतो डाळिंब बहराचे...शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब शेतकरी ः ज्ञानेश्वर...
कृषी हवामान सल्‍ला (मराठवाडा विभाग)भारतीय हवामान विभागाच्‍या अंदाजानुसार,...
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...