Agriculture Agricultural News BJP announces state executive Mumbai Maharashtra | Agrowon

भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये बहुतांश विद्यमान पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. 

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये बहुतांश विद्यमान पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची निवड करण्यात आली असून, भांडारी यांच्याजागी केशव उपाध्ये यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचा समावेश विशेष निमंत्रितांच्या मंडळात करण्यात आला. पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत स्थान मिळणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे; तसेच विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार आशिष शेलार व आमदार माधुरी मिसाळ असतील, असेही ते म्हणाले.

जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये १२ प्रदेश उपाध्यक्ष, ६ प्रदेश सरचिटणीस व १२ चिटणिसांचा समावेश आहे. त्याशिवाय सात मोर्चा आणि १८ विविध प्रकोष्ठांची नियुक्तीही जाहीर करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष पदाची सूत्रे चंद्रकात पाटील यांनी फेब्रुवारीत स्वीकारल्यानंतर ही पदाधिकारी घोषणा करण्यात आली. कार्यकारिणीत तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

त्य़ाचबरोबर या पदाधिकारी कार्यकारिणीत ३३ टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांशिवाय कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली असून, पदाधिकाऱ्यांशिवाय ६८ जणांची कार्यकारिणी आहे. त्याशिवाय १३९ जण निमंत्रित असून ५८ जण विशेष निमंत्रित असतील. सर्व आमदार-खासदार हे कार्यकारिणीचे कायम निमंत्रित सदस्य असतील. त्याशिवाय कोषाध्यक्ष, कार्यालय प्रभारी, कार्यालय सहप्रभारी, प्रदेश कार्यालय मंत्री व सहकार्यालय मंत्री यांचीही घोषणा करण्यात आली.

काही पदाधिकारी पुढीलप्रमाणे 
सरचिटणीस ः सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय
उपाध्यक्ष ः राम शिंदे, चित्रा वाघ, कपिल पाटील, प्रसाद लाड, माधव भांडारी, सुरेश हळवणकर, प्रीतम मुंडे
मुख्य प्रतोद ः आशिष शेलार, प्रतोद माधुरी मिसाळ, महिला मोर्चा ः उमा खापरे, युवा मोर्चा ः विक्रांत पाटील.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...