राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : राज्याचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर करण्याचा निर्णय सोमवारी (ता.११) संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. संसदेप्रमाणेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्यात येणार आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीत अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला. अर्थसंकल्पासाठी आधी ५ मार्च ही तारीख ठरली होती. मात्र, ५ ऐवजी ६ मार्चला अर्थसंकल्प सादर करण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. या बैठकीत २४ फेब्रुवारी ते २० मार्च असा चार आठवड्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. या दरम्यान पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक होऊन अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. याशिवाय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, अर्थसंकल्प, अर्थसंकल्पावर खातेनिहाय चर्चा तसेच विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप असे कामकाजाचे स्वरूप आहे. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com