agriculture agricultural news cabinet expansion after twenty one december mumbai maharashtra | Agrowon

मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाचे वाटप निश्‍चित झालेले असले, तरी खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे उपमुख्यमंत्री पदासाठी नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाचे वाटप निश्‍चित झालेले असले, तरी खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे उपमुख्यमंत्री पदासाठी नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदे व मिळणारी खाती यावर सहमती मिळवली आहे. कॉंग्रेसकडून मुंत्रपदाची शपथ घेणाऱ्यांची यादीदेखील तयार आहे. मात्र, राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांनाच आग्रह केला असून, त्यांचे मन वळविण्याची तयारी सुरू आहे. अजित पवार पक्षाच्या कामात सक्रिय झाले असले, तरी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत ते अद्याप तयार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षातील सर्व नेते व आमदार यांना अजित पवार मंत्रिमंडळात हवे असून, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.

नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. केवळ पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून, सहा मंत्र्यांवरच कामकाज उरकण्याचा भार राहणार आहे. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत या सहा मंत्र्यांनाच विरोधकांचा सामना करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे आव्हान आहे. याअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९७८ ला पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर केवळ चार मंत्र्यांवरच हिवाळी अधिवेशन घेतले होते. त्यामुळे, दोन्ही सभागृहांचे कामकाज करण्यात या सहा मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा केला जात आहे.  


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...