डाटा सेंटर्सना प्रोत्साहन देणार ः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : हिरानंदानी ग्रुपने बदलत्या काळाची पावले ओळखून मुंबईनजीक आशियातले सर्वांत मोठे डेटा सेंटर उभारल्याने निश्चितच राज्याला याचा फायदा होईल. डाटाचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील काळात सुद्धा राज्य शासन विशेषत: डाटा सेंटर्सना प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  : हिरानंदानी ग्रुपने बदलत्या काळाची पावले ओळखून मुंबईनजीक आशियातले सर्वांत मोठे डेटा सेंटर उभारल्याने निश्चितच राज्याला याचा फायदा होईल. डाटाचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील काळात सुद्धा राज्य शासन विशेषत: डाटा सेंटर्सना प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पनवेल येथील ६०० एकरांवरील हिरानंदानी फोर्च्युन सिटीमध्ये उभारलेल्या योट्टा डेटा सेंटरचे ऑनलाइन उद्‌घाटन श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद, उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की राज्य शासनाने डेटावर आधारित अर्थव्यवस्थेला प्राधान्य द्यायचे ठरविले आहे. त्यादृष्टीने राज्यात डेटा सेंटर्स उभारण्याला प्राधान्य देत आहोत. या स्टेट ऑफ दि आर्ट डेटा सेंटर्समुळे जागतिकस्तरावरही महाराष्ट्राची छाप पडणार आहे. महाजॉब्स पोर्टलची सुरुवात करून महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे.

आपल्याला सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची गरज असते. उद्योगांची गरज आणि नोकरी इच्छुक व्यक्ती यांची सांगड घालणारे महाजॉब्स हे एक वैशिष्ट्यपूर्ण पोर्टल आहे. आज आपण ‘कोरोना’शी लढतो आहोत. यासाठी तंत्रज्ञान आमच्या मदतीला येतेय. टेलीमेडिसिन असो, टेलीआयसीयू किंवा वरळी येथील कोविड केंद्रावर तर रोबो हे डॉक्टरांना मदत करीत आहेत. आताच्या युगातले हे तंत्रज्ञान जीवन देणारे आणि आयुष्य समृद्ध करणारे आहे.

याप्रसंगी बोलताना केंद्रीयमंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले, की आमचे सरकार येण्यापूर्वी केवळ २ मोबाईल कंपन्या देशात होत्या,आता २६० कंपन्या आहेत. इंटरनेट वापरात जगाच्या तुलनेत आपण २० टक्के असलो तरी डेटा उपयोग केवळ २ टक्के आहे. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, मोबाईल इकॉनॉमी , डेटा व्यवस्थापन, डेटा साठवणूक आणि सुरक्षा याला प्रचंड महत्त्व येणार आहे. डेटा संरक्षण कायदाही आपण मंजूर केला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीदर्शन हिरानंदानी यांनी प्रास्ताविक केले. हिरानंदानी ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी व योट्टा इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गुप्ता यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com