Agriculture Agricultural News chief minister take a review of animal husbandry departments schemes mumbai maharashtra | Agrowon

दूध, मांस, अंडी, लोकर उत्पादनवाढीसाठी नवी योजना राबवा : मुख्यमंत्री ठाकरे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

दुग्धव्यवसाय विभागाच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल सादर करावा. दूध प्रकल्प बंद असलेल्या ठिकाणी आधुनिक दूध प्रकल्प सुरू करण्याकरिता आराखडा तयार करावा.
— उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.

मुंबई  : राज्यात दूध, अंडी, मांस व लोकर उत्पादनवाढीसाठी नवीन योजना राबवावी. यामुळे राज्यात असलेली दूध, अंडी आणि मांसाची तूट भरून निघेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागांची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी (ता. १४) झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, मत्सव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख, पदुम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त राजू जाधव, पशुसंवर्धन आयुक्त नरेंद्र पोयाम, पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. धनराज परकाळे, शेळी मेंढी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश बनसोडे, सहसचिव माणिक गुट्टे उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, की पशुपैदास धोरण राबवताना कृत्रिम रेतनाद्वारे पशुधनामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा. शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे, शेळी गट, कुक्कुटपक्षी वाटप करून पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून द्यावे. पशुधनास लागणारे वैरण व पशुखाद्याची उपलब्धता वाढवावी. पशुधनास लागणाऱ्या लसींची निर्मिती करावी. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची व्यापकता वाढवावी. कोकणातील आनंदवाडी मत्स्य प्रकल्पाप्रमाणे राज्यात प्राधान्यक्रम ठरवून प्रकल्पांचा आराखडा तयार करावा. मत्स्य प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा विकसित कराव्यात. तसेच मासेमारीसाठी एलईडीचा वापर टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...