नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी मदत करावी ः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

बुलडाणा जिल्ह्याचा आढावा घेताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
बुलडाणा जिल्ह्याचा आढावा घेताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येईल. यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

बुलडाणा जिल्ह्याच्या आढाव्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिगाव प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागपूर येथे विधान मंडळातील मंत्री परिषद बैठक सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे व विभागप्रमुख उपस्थित होते.

सिंदखेडराजा व लोणार विकास आराखडा पूर्ण करण्याच्या सूचना करीत ते म्हणाले, की हे दोन्ही विषय आपल्या जिव्हाळ्याचे आहेत. सिंदखेडराजा विकास आराखड्याबाबत केलेल्या डिझाईनचे सादरीकरण मंत्रालयात आपणास दाखवावे. त्यात ज्या काही सुधारणा करायच्या असतील त्या केल्या जातील. लोणार सरोवर परिसरात स्वच्छता राखावी, पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा आराखड्याअंतर्गत देण्यासाठी काम केले जावे. हे दोन्ही आराखडे पूर्ण केले जातील. चिखली व खामगाव येथे टेक्सटाईल पार्क उभाण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या ठिकाणची सद्य:स्थिती बघून निर्णय घेण्यात येईल. खडकपूर्णा जलसिंचन उपसा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण करावा. पेनटाकळी प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करावी. जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

‘जिगाव’साठी स्वतंत्र बैठक घेणार बुलडाणा जिल्ह्यातील सिंचन विस्तारासाठी जिगाव प्रकल्प पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी नियमित तरतुदी व्यतिरिक्त अतिरिक्त निधी देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. या प्रकल्पाच्या संदर्भात मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. प्रकल्प पूर्णत्वासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीकरिता जलसंपदा विभागाने प्रस्ताव देण्याची सूचना श्री. ठाकरे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com