केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

गेल्या दोन महिन्यांत राज्यातील विविध प्रश्नांना न्याय दिला आहे. नागपूर अधिवेशन काळात विदर्भातील सर्व जिल्ह्यांची बैठक घेतली. मराठवाड्यातही अशाच प्रकारे बैठक घेतली. आता उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राची बैठक घेणार आहोत. -उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडित सर्वंच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट दाखवावी,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे राज्याच्या प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती गठीत करून तिच्या समन्वयकपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये समितीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

सह्याद्री अतिथिगृह येथे सोमवारी झालेल्या बैठकीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दादा भुसे, नवाब मलिक, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. 

यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे कुटुंब म्हणून खासदारांनी दिल्लीत काम करावे आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडताना विषयानुरूप टीम तयार करा. त्यात पक्षीय भेदाला थारा देऊ नका. ज्यावेळी महाराष्ट्रातील विषयांवर खासदार संसदेत विचार मांडणार असतील त्यावेळी सर्व खासदारांनी आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे. पुढील महिन्यात दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये खासदारांची बैठक घेऊन प्रश्न सुटले की नाहीत याचा आढावा घेऊ.’’  

बैठकीत खासदारांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्यावर राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन ते मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com