महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ` मानांकन 

सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरला आयएसओ - ९००१ : २०१५ हे मानांकन प्राप्त झाले आहे.
आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरला आयएसओ - ९००१ : २०१५ हे मानांकन प्राप्त झाले आहे. आरोग्य वर्धिनी इमारतीत अत्याधुनिक सुविधांनीयुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर या आरोग्य केंद्राला अशा प्रकारे बहुमान मिळाल्याचा जिल्हा प्रशासनाला अभिमान आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. 

या सेंटरमध्ये हॅण्ड वॉश स्टेशन, ॲटोमॅटिक सॅनिटायझर यंत्रणा बसविण्यात आली आहे. आर.ओ. प्लांट, अखंडीत वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची सुविधा लोकसहभागातून करण्यात आली आहे. उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ २४ तास उपलब्ध आहे. कोरोना बाधित रुग्ण व संशियत रुग्ण तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना पीपीई किट, फेस शिल्ड, एन ९५ मास्क, हॅण्ड ग्लोव्हज्‌ तसेच उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रातून अथवा इतर ठिकाणाहून संशयित रुग्णांना सेंटरमध्ये आणले जाते. तपासणीनंतर तो संशयित आहे का कोरोना बाधित रुग्ण आहे. त्यानुसार विभागणी करुन संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येते. संशियत रुग्णांसाठी ३४ बेडची तर कोरोना बाधित रुग्णांसाठी १८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दाखल रुग्णांना प्राथमिक सुविधा देण्यात येतात. त्यामध्ये दैनंदिन वापरासाठी हॅण्डवॉश, सॅनिटायझर, मास्क, कपडयांचा व अंगाचा साबण, तेल, पावडर, टॉवेल, नॅपकीन आदी वस्तू दिल्या जातात. रुग्णांना पौष्टीक आणि सकस आहार दिला जातो, असेही डॉ.मोहिते यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com