Agriculture Agricultural News Corona-infected patient found Chandrapur Maharashtra | Agrowon

चंद्रपूरमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

चंद्रपूर (प्रतिनिधी) ः आजवर ‘कोरोना’मुक्‍त असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या ‘कोरोना’बाधित रुग्णाची नोंद झाल्याने प्रशासनाकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्काळ परिसर सील करण्यात आला आहे. 

चंद्रपूर  ः आजवर ‘कोरोना’मुक्‍त असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या ‘कोरोना’बाधित रुग्णाची नोंद झाल्याने प्रशासनाकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्काळ परिसर सील करण्यात आला आहे. 

पूर्व विदर्भातील दारुबंदी असलेले वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे ‘कोरोना’मुक्‍त म्हणून ग्रीन झोनमध्ये आहेत. कोरोनाबाधीत एकही व्यक्‍ती नसला तरी स्थानिक प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना प्रतिबंधात्मक सर्वच उपाययोजनांवर भर दिला गेला आहे. त्यामुळेच या जिल्ह्यांना कोरोना रोखण्यात यश आले. असे असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद झाल्याने प्रशासन अधिक दक्ष झाले आहे.

चंद्रपूरच्या कृष्णनगरातील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय इसमाला छातीत दुखण्याचा त्रास होता. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली. ताप आणि खोकलाही असल्यामुळे त्याचे थ्रोट स्वॅब नागपूरला पाठविण्यात आले. हा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णाबाबत गेल्या २८ दिवसांची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सदर रुग्ण आपण कुठेही गेलेलो नाही, असेच सांगत असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. रुग्णाकडून आवश्‍यक माहिती मिळविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...