Agriculture Agricultural News corona patient increase in district Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात ४२ जणांना कोरोनाचा संसर्ग

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 एप्रिल 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. गावाबाहेरून आलेल्यांना क्वारंटाइन केले आहे. हवेलीमधील गावांमध्ये नागरीकरण जास्त आहे, शहरी भागामध्ये जाणे-येणे असल्याने इतर रुग्णांच्या संपर्कात आल्याने रूग्ण सर्वाधिक आहेत. महापालिकालगतच्या क्षेत्रातच हे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढलेला नाही.
- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

पुणे   : शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती आणि नगरपालिका क्षेत्रातील ४२ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, ११ जणांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये २८ जणांवर उपचार सुरू आहेत. शहरालगत तसेच नागरिकरण अधिक असलेल्या भागातच प्रमुख्याने कोरोनाचा प्रसार अधिक असल्याचे दिसून आले आहे. हवेली तालुक्यात सर्वाधिक २० रुग्ण आढळून आल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी (ता.२७) पंचायत समिती क्षेत्रात ३५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर नगरपालिका क्षेत्रात केवळ बारामतीमध्ये ७ रुग्ण आढळले आहेत. बारामती नगरपालिकेच्या हद्दीत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पाच रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले असून, एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागाचा विचार करता शहरालगतच्या भागात असलेल्या व शहरात येणे-जाणे असलेल्या हवेलीमध्ये सर्वाधिक २० रुग्ण असून, यापैकी १८ रुग्ण उपचार घेत आहेत.

या शिवाय वेल्हा तालुक्यात ८ रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी ७ रुग्णांवर सध्या उपाचर सुरू आहेत, तर एका रुग्णास घरी सोडण्यात आले आहे. शिरूर आणि भोरमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले असून, त्यापैकी शिरूर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर बारामती, जुन्नर आणि मुळशीमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत. बारामती तालुक्यात आढळलेल्या एकमेव रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर जुन्नर आणि मुळशीतील रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. आंबेगाव, दौंड, इंदापूर, खेड, मावळ आणि पुरंदर तालुक्यांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
 

 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...