साताऱ्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४१ वर

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२२) एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नसल्याने समाधानाचे वातावरण होते. मात्र शनिवारी (ता.२३) सकाळी आलेल्या अहवालात तब्बल ४० जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला आणखी मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २४१ वर पोचली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२२) एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नसल्याने समाधानाचे वातावरण होते. मात्र शनिवारी (ता.२३) सकाळी आलेल्या अहवालात तब्बल ४० जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला आणखी मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २४१ वर पोचली आहे.

शनिवारी सकाळी जिल्ह्याला मोठा धक्का बसला. ४० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. यात पाटण, कऱ्हाड, सातारा आदी तालुक्यातील बाधित यांचा समावेश आहे.

यातील बहुतांश बाधित मुंबई तसेच बाहेरून प्रवास करून आल्याचे दिसून येते. यात पाटण तालुक्यातील १५, कऱ्हाड तालुक्यातील सहा बधितांचा समावेश आहे. पाटण तालुक्यातील डेरवन येथील दहा महिन्याचा बालक कोरोन मुक्त झाल्यानंतर पाटण तालुका कोरोनामुक्त झाला होता. मात्र, नव्याने १५ रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये तालुक्यातील म्हासोली, पाटणसह खंडाळा तालुक्यातील पारगाव- खंडाळा, पिंपोडे, वाई तालुक्यातील वासोली, सातारा मधील शाहूपुरी, जकातवाडी, खावली येथील रुग्णांचा समावेश आहे.बहुतांश रुग्ण मुंबई, जळगाव आदी ठिकाणाहून प्रवास करून आलेले समजते. जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४१ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com