Agriculture Agricultural News corona patient increase in market committee Mumbai Maharashtra | Agrowon

मुंबई बाजार समितीत आणखी ६ जणांना कोरोना; रुग्णसंख्या १२ वर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मसाला मार्केटमधील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कोरोनाबाधित वेटरच्या संपर्कात आलेल्या ६ जणांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता या बाजारसमितीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली आहे.

मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मसाला मार्केटमधील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कोरोनाबाधित वेटरच्या संपर्कात आलेल्या ६ जणांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता या बाजारसमितीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. ज्या लोकांना ‘कोरोना’ची बाधा झाली आहे, अशांच्या आजूबाजूचे काही गाळे चौदा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

पहिल्यांदा सोमवारी (ता.२७) एप्रिलला भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्याला ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. २८) धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला ‘कोरोना’ची लागण झाली. याआधी एल विंगमधील व्यापाऱ्याला ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला, एका हॉटेल कर्मचाऱ्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या ६ जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारसमिती प्रशासनाने मार्केटच्या प्रवेशद्वाराबाहेर सोशल डिस्टन्सिंगसाठी बॅरिकेट्स लावले आहेत. प्रवेशद्वारावर सॅनिटाईझ करून गाड्यांना आत प्रवेश दिला जात आहे. मात्र, मार्केटच्या आत प्रवेश केल्यावर व्यापारी आणि ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यापारी, ग्राहक, माथाडी कामगार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे काम नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरु झाले आहे. मंगळवारी एका सुरक्षारक्षकाला कोरोना संसर्ग झाल्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण आहे. तो अनेक अधिकारी, ग्राहकांच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेकांना ‘कोरोना’ची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच घटकांची कोरोना चाचणी करून मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल युनियनने सुरु केला आहे.

मंगळवारपासून या तपासण्या सुरू केल्या असून सर्व घटकांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असल्याचे संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले. साडेचार हजार रुपये खर्चाची ही तपासणी संघटनेच्या प्रयत्नाने तीन हजारांत होणार असून व्यापारी वर्ग यासाठी पुढाकार घेण्यास तयार आहेत. बाजारसमितीतील धान्य, मसाला, कांदा, भाजी आणि फळ या पाचही बाजारांतील घटकांची तपासणी होणार असून या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासण्या महत्त्वाच्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी सहकार्य केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...