Agriculture Agricultural News cotton procurement planning meeting Mumbai Maharashtra | Agrowon

कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः पणन मंत्री बाळासाहेब पाटील

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

मुंबई : कॉटन कॉर्पेारेशन आॅफ इंडिया (सीसीआय) आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासूनच प्रभावी नियोजन करून कापूस खरेदी व्यवस्थितपणे पार पाडावी, अशी सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत.

मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे कॉटन कॉर्पेारेशन आॅफ इंडिया (सीसीआय) आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासूनच प्रभावी नियोजन करून कापूस खरेदी व्यवस्थितपणे पार पाडावी, अशी सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत.

आगामी हंगामाच्या पूर्व तयारीबाबतचा आढावा मंत्री पाटील यांनी मंगळवारी (ता.२९) मंत्रालयात घेतला. बैठकीला पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना,  पणन संचालक सतीश सोनी, ‘सीसीआय’चे व्यवस्थापकीय संचालक पी. के. अग्रवाल आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, की कृषी खात्याच्या अंदाजानुसार आगामी हंगामामध्ये सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आले असून ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपेक्षित आहे. याचा विचार करून सीसीआय, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासून कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे. जेणेकरून खरेदी प्रक्रियेत अडथळे राहणार नाहीत.

जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी यांच्याशी समन्वय ठेवून कापूस खरेदीचे नियोजन करून प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर किमान १ ग्रेडर असावा. कापूस खरेदी पूर्वीच कृषी विभागामार्फत आवश्यक ते मनुष्यबळ ग्रेडर म्हणून उपलब्ध करून घेत त्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन नेमणुकीचे आदेश द्यावेत. खरेदी केलेल्या कापूस साठवणुकीची व्यवस्था, सुविधा इतर नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने गोदामे, शेड, ताडपत्री ही व्यवस्था करावी. 

बाजार समितीच्या स्तरावर शेतकरीनिहाय नोंदवही, रेकॉर्ड ठेवले जावे. ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील असावेत. खरेदी केंद्रांवर कापूस आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना कापूस खरेदीचे ठिकाण व वेळ याबाबत मोबाईलव्दारे संदेश पाठविण्यात यावेत, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

प्रतिक्रिया
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी एकाच वेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही, या दृष्टीने सर्व उपाययोजना करावी. तसेच गाडी पार्किंग, शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था करावी.
- बाळासाहेब पाटील, सहकार व पणनमंत्री.
 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...