खासदार डॉ. महास्वामींवर अखेर गुन्हा दाखल

 खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

सोलापूर   ः बनावट जातप्रमाणपत्रप्रकरणी सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार डॉ. महास्वामी यांच्यासह अक्कलकोट आणि उमरगा तहसील कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यात सहआरोपी करण्यात आले आहे. 

अक्कलकोटचे प्रभारी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी ही फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी ऊर्फ नुरंदस्वामी गुरबसय्या हिरेमठ यांनी लोकसभा निवडणुकीत दाखल केलेले जातप्रमाणपत्र बनावट असल्याने ते सोलापुरातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यावरुन ही फिर्याद दिली आहे. खासदार डॉ. महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचे बनावट प्रमाणपत्र बनवून हे प्रमाणपत्र खोटे आहे, हे माहीत असूनही खोट्या प्रमाणपत्राचा दुरुपयोग करून हे प्रमाणपत्र खरे आहे, असे भासवले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खोट्या प्रमाणपत्राचा वापर करून शासकीय व आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने शासनाची फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. 

याप्रकरणी लोकसभा निवडणुकीचे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच महास्वामींना प्रमाणपत्र देणारे अक्कलकोटचे (१५ जानेवारी १९८२) तत्कालीन तहसीलदार, संबंधित अधिकारी यांनाही यामध्ये सहआरोपी करण्यात आले आहे. या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून जिल्हा पडताळणी समितीचे अध्यक्ष, याप्रकरणातील मूळ तक्रारदार प्रमोद गायकवाड, विनायक कंदकुरे, मिलिंद मुळे यांना साक्षीदार करण्यात यावे, असेही या फिर्यादीत म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com