महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली

मागील दोन ते चार वर्षांचा अनुभव पाहता, येत्या दोन ते तीन दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास सोयाबीन पिकावर कीड -रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. - विनोद खंदारे, शेतकरी, अंबोडा, जि. यवतमाळ
अंबोडा परिसरात अल्प पावसाने अशा प्रकारे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे.
अंबोडा परिसरात अल्प पावसाने अशा प्रकारे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे.

अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात बियाणे उगवणविषयक तक्रारी वाढल्या आहेत. मात्र उगवण झालेली पिकेदेखील अपुऱ्या आणि हलक्या पावसामुळे जास्त काळ तग धरण्याची शक्यता नाही. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मॉन्सूनचे आगमन होऊन महिना लोटला असला, तरी अंबोडा आणि परिसरात अद्यापही पिकाला पोषक पाऊस बरसलाच नाही. सकाळच्या सुमारास कडक ऊन; तर दुपारी ढगांची गर्दी आकाशात होत असली तरी पाऊस नसल्यामुळे कसेबसे अंकुरलेले पीक वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. महागाव तालुक्यातील थोड्याबहुत शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाचे पर्याय आहेत. ते स्त्रोतदेखील मर्यादित असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दमदार पाऊस सातत्याने हुलकावणी देत आहे. त्यातच वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे पिके कोमेजून जात आहेत.

या आठवड्यात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. सोबतच प्रतिकूल हवामानामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगतात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com