पुणे झेडपी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण यंदा महिलांच्या खुल्या गटासाठी असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे खुल्या गटातील १५ सदस्यांमध्ये अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यामध्ये हवेली तालुक्यातून पूजा पारगे, अर्चना कामठे, मावळ मधून शोभा कदम, खेडमधून निर्मला पानसरे आणि शिरूरमधून स्वाती पाचुंदकर या पाच सदस्यांमध्ये प्रमुख चुरस रंगणार आहे. 

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड होणार असून, या निवडीसाठी इच्छुकांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने कोणतीही राजकीय कुरघोडी होण्याचा प्रश्‍न नाही. मात्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची नावे निश्‍चित असून, उर्वरित तिसरे मंत्रिपद काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांना मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. यामुळे या तीनही तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद जाण्याची शक्यता नाही. सध्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष हे बारामती तालुक्यात असल्याने पुढील अध्यक्षपद शिरूर, हवेली किंवा खेडला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिरूरमधून स्वाती पाचुंदकर किंवा खेडमधून निर्मला पानसरे यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे.    पंचायत समित्यांच्या सभापतिपदासाठीही जोरदार चुरस  पंचायत समित्यांसाठीच्या देखील निवडी जानेवारी महिन्यात होणार असून, यासाठी राजकीय घडामोडी सुरू आहेत. विविध पंचायत समिती सदस्यांना पर्यटनस्थळी नेण्यात आले असून, राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू होणार नसल्याचा इशारा देखील तीनही पक्षांच्या नेत्यांनी दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने जुन्नर आणि खेड पंचायत समित्या शिवसेनेच्या ताब्यात असून, हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com