दादा भुसे राज्याचे नवे कृषिमंत्री

कृषिमंत्री दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे

मुंबई  : महाविकास आघाडीचे बहुप्रतिक्षित खातेवाटप अखेर रविवारी (ता. ५) जाहीर झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी सकाळी मान्यता दिली. त्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची खाती जाहीर करण्यात आली आहेत. ठाकरे सरकारमध्ये राज्याच्या कृषी खात्याची धुरा शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास, बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार व पणन आणि काँग्रेसचे सुनील केदार यांच्याकडे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खाते,  तर  संदिपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी, फलोत्पादन खाते सोपविण्यात आले आहे.

या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन हे खाते आले आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्याकडे गृह खाते देण्यात आले आहे. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून) तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) ही दोन खाती आली आहेत.  

खातेनिहाय मंत्री असे...

  • उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री ः सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय-खाती. 
  • अजित पवार ः उपमुख्यमंत्री ः वित्त, नियोजन.
  • सुभाष देसाई ः उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा.
  • अशोक चव्हाण ः सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).
  • छगन भुजबळ ः अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
  • दिलीप वळसे-पाटील ः कामगार, राज्य उत्पादन शुल्क.
  • जयंत पाटील ः जलसंपदा व लाभक्षेत्र विकास.
  • नवाब मलिक ः अल्पसंख्याक विकास, कौशल्य विकास व उद्योजकता.
  • अनिल देशमुख ः गृह.
  • बाळासाहेब थोरात ः महसूल.
  • राजेंद्र शिंगणे ः अन्न व औषध प्रशासन.
  • राजेश टोपे ः सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.
  •  हसन मुश्रीफ ः ग्रामविकास.
  • डॉ. नितीन राऊत ः ऊर्जा. 
  • वर्षा गायकवाड ः शालेय शिक्षण.
  • डॉ. जितेंद्र आव्हाड ः गृहनिर्माण.
  • एकनाथ शिंदे ः नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).
  • सुनील केदार ः पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण.
  • विजय वडेट्टीवार ः इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन.
  • अमित देशमुख ः वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य.
  • उदय सामंत ः उच्च व तंत्र शिक्षण.
  • दादाजी भुसे ः कृषी, माजी सैनिक कल्याण.
  • संजय राठोड ः वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन.
  • गुलाबराव पाटील ः पाणीपुरवठा व स्वच्छता.
  • ॲड. के. सी. पाडवी ः आदिवासी विकास.
  • संदीपानराव भुमरे ः रोजगार हमी, फलोत्पादन.
  • बाळासाहेब पाटील ः सहकार, पणन.
  • ॲड. अनिल परब ः परिवहन, संसदीय कार्य.
  • अस्लम रमजान अली शेख ः वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास.
  • ॲड. यशोमती ठाकूर  ः महिला व बालविकास.
  • शंकरराव गडाख ः मृद व जलसंधारण.
  • धनंजय मुंडे  ः सामाजिक न्याय व विशेष साहाय्य.
  • आदित्य ठाकरे ः पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार.
  • राज्यमंत्री

  • अब्दुल सत्तार ः महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास
  • सतेज पाटील ः गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.
  • शंभुराज देसाई ः गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन. 
  • बच्चू कडू ः जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार.
  • दत्तात्रय भरणे ः सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन.
  • डॉ. विश्वजित कदम ः सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास, मराठी भाषा.
  •  राजेंद्र पाटील यड्रावकर ः सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य.
  • संजय बनसोडे ः पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य.
  • प्राजक्त तनपुरे ः नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन. 
  • अदिती तटकरे ः उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com