लासूर (ता. चोपडा, जि.
बातम्या
हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची शक्यता : दिलीप वळसे पाटील
पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे. त्यामुळे आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असून, हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या घोषणेची शक्यता आहे, अशी माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कात्रज दूध संघाच्या वतीने आयोजित डेअरी एक्स्पोच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर शनिवारी (ता.१४) श्री. वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीमध्ये खाते वाटपाबाबत कोणतीही नाराजी नाही. त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप झाले असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तसेच महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात कर्जमाफी हा विषय असल्याने सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.’’
- 1 of 1503
- ››