दिल्ली विधानसभेसाठी आठ फेब्रवारीला मतदान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली ः बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी निवडणूक आयोगाच्या घोषणेने सोमवारपासून सुरू झाली. विधानसभेचे बिगुल वाजले असून, दिल्लीतील ७० जागांसाठी एकाच टप्प्यात ८ फेब्रुवारीला मतदान होईल. तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष विरुद्ध कॉंग्रेस असा तिरंगी मुकाबला रंगेल.

निवडणुकीच्या तारखांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या घोषणेसोबतच दिल्लीत आदर्श आचारसंहितादेखील लागू झाली आहे.  दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी १२ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. यंदा १.४६ कोटी मतदार आपला मताधिकार बजावतील. त्यांच्यासाठी १३ हजार ७५० मतदान केंद्रे उभारली जातील.

विजयाचे दावे निवडणुकीची घोषणा होताच आप, भाजप आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी विजयाचे दावे केले आहेत. आम आदमी पक्ष दिल्लीच्या विकासाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवणार आहे. तर भाजपने राष्ट्रवाद विरुद्ध अराजकता आणि नागरिकत्व कायद्याला विरोधाच्या मुद्द्यावरून "आप'ला घेरण्याची रणनीती आखली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचाही यंदा भोपळा फोडणे आणि किमान दोन आकडी संख्याबळ गाठून "किंगमेकर' बनण्याचा प्रयत्न असेल.   असे असेल वेळापत्रक

  • अधिसूचना : १४ जानेवारी
  •  निवडणूक अर्ज भरण्यास प्रारंभ :  २१ जानेवारी
  • उमेदवारी अर्ज छाननी : २२ जानेवारी
  • अर्ज माघारीची अंतिम मुदत : २४ जानेवारी
  • मतदान : ८ फेब्रुवारी
  • निकाल : ११ फेब्रुवारी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com