Agriculture Agricultural News demand for to give compensation to farmers Aurangabad Maharashtra | Agrowon

नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रूपयांची भरपाई देण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

औरंगाबाद  : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक तर विमा कंपनीकडून संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी किंवा केंद्र व राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील हुड यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

औरंगाबाद  : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक तर विमा कंपनीकडून संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी किंवा केंद्र व राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील हुड यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

या निवेदनानुसार, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मार्केट बंद आहेत. यामुळे नाशवंत फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात द्राक्षे, संत्रा, मोसंबी, आंबा, टरबूज, केळी आदी फळबागांचे ५० टक्के नुकसान झाले असताना, अवकाळी पावसामुळे शिल्लक असलेला माल वाया जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. लॉकडाऊननंतर अन्य नागरिकांचे जनजीवन सुरळीत होईल. परंतु, नुकसान झालेले शेतकरी वर्षभर काहीच करू शकणार नाही.

कोरोना व अवकाळी पाऊस या दोन्ही आपत्तींच्या वेळी पीक विमा कंपनी फक्त ११, ७०० रूपये देत बोळवण करून मोकळी होणार आहे. केंद्र सरकार दोन हजार रूपये देणार आहे; परंतु ते कधी खात्यात जमा होणार अन त्यात होणार तरी काय, असा सवाल राष्ट्रीय किसान परिषदेने केला आहे. दोन हजारांऐवजी कृषी व्यवस्था कशी सुरळीत राहिल याकडे लक्ष देण्याचे आवाहन श्री. हूड यांनी केले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...