Agriculture Agricultural News demand to make the law of the presence of fifty persons for marriage ceremony Nagar Maharashtra | Agrowon

लग्नासाठी पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीचा कायदा कायमस्वरूपी  करा ः संभाजी दहातोंडे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

नगर  ः कोरोना आजाराचे संकट व त्यामुळे करण्यात आलेला लॉकडाउनचा निर्णय अशा परिस्थितीत शासनाने तूर्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न करण्यात यावा, असे आदेश जारी केले आहेत. सध्या तात्पुरत्या काळासाठी केलेला हा कायदा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नगर  ः कोरोना आजाराचे संकट व त्यामुळे करण्यात आलेला लॉकडाउनचा निर्णय अशा परिस्थितीत शासनाने तूर्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न करण्यात यावा, असे आदेश जारी केले आहेत. सध्या तात्पुरत्या काळासाठी केलेला हा कायदा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

श्री. दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सध्या संकटकाळाची गरज म्हणून हा कायदा करण्यात आला आहे आणि नागरिकही या कायद्याची अंमलबजवणी करत केवळ ५० किंवा त्यापेक्षा ही कमी लोकांतही विवाह सोहळे पार पडत आहेत. एकट्या नगर जिल्ह्यात एक हजारांहून अधिक विवाह या पद्धतीने झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षे भव्य दिव्य लग्न सोहळा करणे हे एक प्रथा झाली. खोटया प्रतिष्ठेसाठी अनावश्यक नसणाऱ्या गोष्टींवर लाखो रुपये खर्च होत होता. त्यामुळे सामान्य लोक यात भरडले जातात व कर्ज बाजारी होतात. सरकारने सध्या घालून दिलेल्या नियमात विवाह होताहेत, त्याबद्दल सध्या तरी कुणी तक्रार नाही. त्यामुळे सरकारने सध्याच्या नियमांचे कायद्यात रूपांतर करावे. त्याची कडक अंमलबजवणी करावी. ज्या नागरिकांना पन्नासहून अधिक लोक लग्नासाठी आणायचे असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी व पन्नासहून अधिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक हजार रुपये आकारणी करण्यात यावी व ही रक्कम दरवर्षी जिल्हास्तरावर शासनाने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून त्यासाठी खर्च करावी, असे दहातोंडे यांनी म्हटले आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...