Agriculture Agricultural News Earn and Learn Scheme for Backward Class Students Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे ‘कमवा आणि शिका’ योजना राबविण्यात येत आहे.

पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे ‘कमवा आणि शिका’ योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांसाठी प्रशासकीय कामांचा अनुभव मिळणार आहे. तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची पदवीदेखील मिळणार असल्याची माहिती समाजकल्याण सभापती सारिका पानसरे यांनी दिली. 

पानसरे म्हणाल्या, की कमवा शिका योजनेतून अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती- जमातींच्या १८ ते २२ वयोगटातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तीन वर्षे प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

तसेच पहिल्या वर्षी ८ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ९ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी १० हजार रुपये मासिक वेतन मिळेल. विद्यार्थ्यांना तीन वर्षे काम आणि स्वयंअध्ययन करून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (सर्व्हिस मॅनेजेमेंट) म्हणजेच ‘बीबीए’ ही पदवी प्राप्त होणार असून, जिल्हा परिषदेकडून तीन वर्षे काम केल्याचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार असल्याचे पानसरे यांनी कळविले आहे.   

ऑनलाइन नोंदणी आवश्यक 
योजनेत सहभागासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना IGNOU.MKCL.ORG या संकेतस्थळावर नोंदणी करून मंगळवारपर्यंत (ता. ७ जुलै) स्व-माहिती भरायची आहे. त्यांनतर शुक्रवारपर्यंत (ता. १०) बीबीए (एसएम) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरायचा आहे. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या punezp.mkcl.org या संकेतस्थळावरही मंगळवारपर्यंत (ता.७) अर्ज करायचा आहे.

दरम्यान १२ जुलै २०२० ला सकाळी ८ ते सायंकाळी ७ दरम्यान प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेतील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांची योजनेमध्ये निवड केली जाईल, अधिक महितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  
 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...