सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के साठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यात झालेला अतिवृष्टी तसेच मॉन्सूनोत्तर पाऊस धरणांतील पाणीसाठा वाढण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये सध्या एकूण ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात एकूण ९३.७८ टीएमसी म्हणजेच ८९.०९ टक्के पाणीसाठा आहे. सर्वच धरणांतील मुबलक पाणीसाठ्यामुळे टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. 

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र हा पाऊस धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. प्रमुख सर्व धरणातून चार ते पाच वेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला. काही धरणांतील पाणी दुष्काळग्रस्त तालुक्यांत सो़डल्याने या भागातील नद्या कालवे दुथडी भरून वाहिले होते. 

सततच्या पावसामुळे धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम-बलकवडी या प्रमुख सहा धरणांतून १३० टीएमसीपेक्षा अधिक पाणी विनावापर सोडावे लागले. कोयना धरणात सध्या ९३.७८ टीएमीसी म्हणजेच ८९.०९ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होणार असल्याने भारनियमन कमी होण्यास मदत होणार आहे.

तसेच धोम धरणात ९०.२८, कण्हेर धरणात ९३.४९, उरमोडी धरणात ९९.६६, तारळी धरणात ८४.६२, धोम-बलकवडी धरणात ९९.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या सर्व प्रमुख धरणात एकूण १३४.५५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे या वर्षी टंचाईच्या काळात धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध राहणार असल्याने टंचाई भासण्याची शक्यता कमी राहणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांत पावसामुळे भूजलपातळीत वाढ झाली आहे. यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी असून, रब्बी पिकांनाही पाणी टंचाई जाणवणार नाही.    

जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)
धरण   पाणीसाठा 
कोयना ९३.७८ 
धोम  १२.१८ 
उरमोडी ९.९३
कण्हेर  ९.४४
धोम-बलकवडी   ४.०७
तारळी ४.९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com