Agriculture Agricultural News election for the Chairman on Monday Mumbai Maharashtra | Agrowon

मुंबई बाजार समितीच्या सभापतिपदाची ३१ ला निवडणूक  

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 ऑगस्ट 2020

मुंबई  : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींची निवडणूक ‘कोरोना’मुळे लांबणीवर पडली होती. येत्या सोमवारी (ता.३१) ही निवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाने सभापती निश्चित होणार आहे.

मुंबई  : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींची निवडणूक ‘कोरोना’मुळे लांबणीवर पडली होती. येत्या सोमवारी (ता.३१) ही निवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाने सभापती निश्चित होणार आहे. या निवडणुकीची सूत्रे आमदार आणि संचालक शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय झाला होता. या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या. सभापती पदासाठी तीन संचालक इच्छुक असल्याचे सांगितले जाते. यात पुणे विभागातून निवडून आलेले माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांचे नाव आघाडीवर आहे. नागपूर विभागातील संचालकदेखील सभापतिपदासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मुंबई बाजार समितीमध्ये रबरी शिक्का असलेला सभापती निवडण्याची परंपरा याहीवेळी अबाधित राहणार का याबद्दलही उत्सुकता कायम आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व राखले आहे. यात १८ पैकी १६ संचालक राष्ट्रवादीचे आहेत. भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग ‘एपीएमसी’मध्येही यशस्वी झालेला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि शेकाप यांनी आपले पॅनल बनवले होते.


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...