आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’ आवश्यक

नागपूर : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते, अर्थात या मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ काय आहे, कधीपर्यंत ती खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकणे (बेस्ट बीफोर डेट) अन्न व औषधी प्रशासनाने अनिवार्य केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते, अर्थात या मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ काय आहे, कधीपर्यंत ती खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकणे (बेस्ट बीफोर डेट) अन्न व औषधी प्रशासनाने अनिवार्य केले आहे.

अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ ऑक्टोबर २०२० पासून सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईसाठी मुदतीची (बेस्ट बीफोर डेट) तारीख प्रदर्शित करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पॅकेटबंद खाद्य पदार्थ अथवा मिष्ठान्नाच्या पाकिटांवरती मुदतबाहय तारीख नमूद करणे बंधनकारक होते.

मात्र अलीकडे खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नातून विषबाधा होण्याचे प्रकार उजेडात आल्याने शासनाने आता बाजारात खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नाच्या ट्रे अथवा भांड्यांवर मुदतबाहय तारीख नमूद करणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नागपूरच्या सहआयुक्तांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com