Agriculture Agricultural News first corona patient in sindhudurga Maharashtra | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’चा प्रवेश; पहिला रुग्ण सापडला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर पडू नये. तसेच एकमेकांशी संपर्क टाळावा. अत्यावश्यक वैद्यकिय सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांनी दक्षता घेऊन घराबाहेर पडावे.

-  के. मंजूलक्ष्मी,जिल्हाधिकारी.

सिंधुदुर्ग  ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’चा पहिला रूग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण कणकवली तालुक्यातील असून मंगलोर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांशी संपर्क आल्याने त्यास लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
 

१९ मार्चला सीएसटीवरून सुटलेल्या मेंगलोर एक्सप्रेसमधून प्रवास करणारा कर्नाटकमधील ७५ वर्षीय प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. या बोगीतून रत्नागिरीत १५ तर कणकवलीत सहा प्रवाशी उतरले होते. कणकवलीत उतरलेल्या दोन जणांचे जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटाइन केले होते. कणकवली स्टेशनला उतरलेल्या या प्रवाशांपैकी तीन प्रवासी पुन्हा मुंबईकडे माघारी गेले आहेत तर यातील एक प्रवासी आपल्या घरी होता. आरोग्य विभागाने शोध मोहिम राबवित या प्रवाशाची आई तसेच त्यालाही होम क्वारंटाइन केले होते. त्याच्या आईला खोकला असल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीसाठी पाठविलेल्या सँपलचा रिपोर्ट प्राप्त झाला असनू एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्या रूग्णांच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्या रुग्णांवर आता जिल्हा रुग्णालयातील कक्षात उपचार सुरू आहेत. मात्र त्यास अद्यापही कोणतीच लक्षणे नसल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक चाकुरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असून परजिल्ह्यातून येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना अडविले जात नसून त्यांना यापुढे पासेस देण्याचीही व्यवस्था करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील काही बँकांच्या एटीएममधून पैसे उपलब्ध होत नसून त्याबाबतच्या सूचना बँकांना करण्यात येतील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...