सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी पावणे चार लाखांचा निधी 

सोलापूर : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विविध वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी जिल्हा विकास निधीतून (डीपीसी) तीन कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीला पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्यता दिल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विविध वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी जिल्हा विकास निधीतून (डीपीसी) तीन कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीला पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्यता दिल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  

शंभरकर यांनी सांगितले, की हा निधी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांकरिता विविध वैद्यकीय सामग्री आणि साहित्य खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिष्ठाता यांना १६१.६८ लाख तर जिल्हा शल्य चिकित्सकांना २११.९९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून पाच व्हेंटिलेटर, २२ मल्टिपॅरा मॉनिटर, २० थर्मल स्कॅनर, १७ डिफॅब्रिलिटर, १७ पल्स ॲक्सोमीटर, ३४ अल्ट्रॉसॉनिक नेब्युलायझर, १०० फाऊलर बेड आदी साहित्य विषाणू प्रार्दुभाव रोखण्यासाठी खरेदी केली जाणार आहेत.

जिल्हा विकास निधीतून आणखी गरज भासल्यास पैस उपलब्ध करुन दिले जातील, असेही पालकमंत्री वळसे-पाटील यांनी आश्वासन दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com