Agriculture Agricultural News government gives grains for two months Pune Maharashtra | Page 3 ||| Agrowon

शिधापत्रिका नसणाऱ्यांना दोन महिन्यांचे धान्य देणार : पुणे जिल्हाधिकारी

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्‍या निर्णयाप्रमाणे आत्मनिर्भर भारत सहाय्य पॅकेजांतर्गत राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांच्‍या कालावधीकरिता पाच किलो तांदूळ वितरीत करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्‍या निर्णयाप्रमाणे आत्मनिर्भर भारत सहाय्य पॅकेजांतर्गत राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांच्‍या कालावधीकरिता पाच किलो तांदूळ वितरीत करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

विना शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ऑफलाइन पध्‍दतीने धान्य वितरण करण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांना त्यांचे आधारकार्ड क्रमांक किंवा कोणतेही शासकीय ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याची पुराव्यादाखल स्वतंत्र नोंद करण्‍यात येईल. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकूण ११३ अन्नधान्य वितरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. यातून १ लाख ३९ हजार ८८२ लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित परिमंडल अधिकारी, तलाठी, स्थानिक नगरसेवक व अन्नधान्य वितरण केंद्रे यांच्‍यामार्फत विना शिधापत्रिकाधारकांना विहीत नमुन्यातील अर्ज वाटप केले जाणार आहेत.

विना शिधापत्रिकाधारकांनी विहीत नमुन्यात भरलेले अर्ज नजीकच्‍या अन्नधान्य वितरण केंद्रात ३० मेपर्यंत जमा करावयाचे आहेत. ज्या अन्नधान्य वितरण केंद्रामध्ये विना शिधापत्रिकाधारक अर्ज भरुन देतील त्याच अन्नधान्य वितरण केंद्रातून संबंधितास अन्नधान्याचे वितरण करण्‍यात येईल. अन्नधान्य घेताना या अर्जाची पोच सोबत आणणे आवश्यक असल्‍याचेही जिल्‍हाधिकारी राम यांनी कळविले आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज ३० मेपर्यंत जमा करावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम;...रत्नागिरी  ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर सांगली  : जिल्ह्यात बुधवार (ता. ८)...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातच २९...परभणी : सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे...
दापोली, मंडणगडमधील ५८५० हेक्टर क्षेत्र...रत्नागिरी  ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
रताळे लागवडीसाठी सुधारित जातीरताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
टप्प्याटप्प्याने करतो डाळिंब बहराचे...शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब शेतकरी ः ज्ञानेश्वर...
कृषी हवामान सल्‍ला (मराठवाडा विभाग)भारतीय हवामान विभागाच्‍या अंदाजानुसार,...
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...