Agriculture Agricultural News government says do not black ration material Nagar Maharashtra | Agrowon

‘किराणा मालाचा काळाबाजार बंद करा’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

जीवनावश्‍यक वस्तू चढ्या भावाने विकू नयेत, यासाठी सर्व किराणा दुकानदारांना निर्देश देण्यात आले आहेत. जो कोणी दुकानदार किराणा मालाची विक्री चढ्या भावाने करीत असेल, त्यांच्यावर जीवनावश्‍यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यात सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. किराणा मालाच्या विक्रीबाबतही काही तक्रार असेल, तर नागरिकांनी नियंत्रण कक्षात संपर्क करावा.
- उमेश पाटील, तहसीलदार, नगर.

नगर ः ‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती मदतीचा हात देत आहेत. दुसरीकडे मात्र, काही लोभी किराणा दुकानदार या संकटातही चढ्या भावाने मालाची विक्री करून काळाबाजार करीत आहेत. ही बाब निदर्शनास येताच, दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा भावाने किराणा माल विकणे बंद करावे, अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.

दिवसेंदिवस किराणा दुकानदारांकडून लूट होत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी आहेत. काही घाऊक व किरकोळ विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा भावाने माल विकण्याचा धडाका लावला आहे. मात्र, प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलत दुकानदारांना सक्त ताकीद दिली आहे. तहसील कार्यालयात नागरिकांच्या शंका समाधानासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सावेडी येथील अजय गायकवाड यांनी फोन करून, रेशन कार्ड नसून पत्नी, मुले उपाशी असल्याचे सांगितले. त्यावर तहसीलदार उमेश पाटील यांच्या निर्देशानुसार संबंधित कुटुंबाला अन्नधान्य घरपोच देण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अशी अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. तहसील कार्यालयाच्या समन्वयाने ९०० व्यक्तींना जेवणाची पाकिटे पुरविण्यात आली. तहसील कार्यालयात सुरू करण्यात आलेला नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. लोकांनी अडचणींसाठी ०२४१-२४११६०० या क्रमांकावर संपर्क साधावा, जेणे करून अडचणीचे प्रशासनाला निवारण करता येईल असे आवाहन केले आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...