Agriculture Agricultural News government should rethink on online exam Pune Maharashtra | Agrowon

कृषी पदव्युत्तरच्या ऑनलाइन परीक्षेचा पुनर्विचार करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

पुणे  ः ‘कोरोना’चा शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहे. सद्यःस्थितीत कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आॅनलाइनच्या नावाखाली भरडले जातील. त्यामुळे सरकाराने व कृषी विद्यापीठांनी या परीक्षेचा पुर्नविचार करावा, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे ई-मेलव्दारे निवेदन पाठवून कृषी पदवीधर सागर कारंडे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुणे  ः ‘कोरोना’चा शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहे. सद्यःस्थितीत कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आॅनलाइनच्या नावाखाली भरडले जातील. त्यामुळे सरकाराने व कृषी विद्यापीठांनी या परीक्षेचा पुर्नविचार करावा, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे ई-मेलव्दारे निवेदन पाठवून कृषी पदवीधर सागर कारंडे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी केली आहे.

सध्या जग ‘कोरोना’चा सामना करत आहे. आपल्या देशात व विशेषतः महाराष्ट्रात रूग्ण संख्या व एकूणच परिस्थिती गंभीर आहे. त्यात सरकारने व कृषी विद्यापीठांनी आॅनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऑनलाइन परीक्षेतील त्रुटींचा विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संभाव्य ऑनलाइन परीक्षा टाळून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याबद्दल सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी केली आहे.
 
कृषी पदवीधर विद्यार्थ्यांचे म्हणणे असे...

  • परीक्षा रद्द कराव्या ही मागणी नाही. तर लॉकडाउननंतर सुरक्षित वातावरणात परीक्षा घ्याव्यात.
  • विद्यार्थी आॅनलाइन परीक्षेच्या विरोधात आहेत
  • देशाच्या कानाकोपऱ्यात पुरेशी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. देशात ३६ व महाराष्ट्रात ४३ टक्के लोकांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे, म्हणून आॅनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हितावह नाहीत.
  • २३ मार्चपासून देशव्यापी लाॅकडाउनमुळे शैक्षणिक संस्था बंद आहेत. अभ्यासक्रमाची साधी ओळख पण विद्यार्थ्यांना नाही.
  • ऑनलाइन शिक्षण हा फार्स आहे.
  • विद्यापीठ प्रशासन शासनाची दिशाभूल करत आहे, जे विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरू शकते
  • पदव्युत्तर शिक्षण संदर्भ ग्रंथांशिवाय अशक्य आहे.सध्या विदयार्थ्यांकडे संदर्भ ग्रंथ उपलब्ध नाहीत.
  • ऑनलाइन परीक्षेमुळे काही विद्यार्थ्यांना साधनांअभावी परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे एकूण गुणतालिकेवर परिणाम होऊन संबंधित विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेश मिळणे अवघड होईल.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...