Agriculture Agricultural News Gram committee is responsible for the quarantine of those from outside the village Pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

बाहेरून आलेल्यांचे विलगीकरणाची जबाबदारी ग्रामसमितीवर : पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

पुणे  : `कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली टाळेबंदी काहीशी शिथील केल्यानंतर पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतून ग्रामीण भागात नागरिकांचे स्थलांतर वाढले आहे. यामुळे ग्रामीण भागात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे गावाबाहेरून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्‍यक आहे. ग्रामपंचायत पातळीवर ही जबाबदारी ग्रामसमितीवर सोपविण्यात आली आहे. गावचे सरपंच या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हे आदेश दिले आहेत.

पुणे  : `कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली टाळेबंदी काहीशी शिथील केल्यानंतर पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतून ग्रामीण भागात नागरिकांचे स्थलांतर वाढले आहे. यामुळे ग्रामीण भागात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे गावाबाहेरून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्‍यक आहे. ग्रामपंचायत पातळीवर ही जबाबदारी ग्रामसमितीवर सोपविण्यात आली आहे. गावचे सरपंच या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हे आदेश दिले आहेत.

टाळेबंदीच्या काळात मूळ गावापासून इतर ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना मूळ गावी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात परराज्यांतून, परजिल्ह्यांतून, शहरीभागातून नागरीक ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात येत आहेत. यातील जे नागरीक रेड झोन, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधून येणार आहेत. अशा लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ दिवस गृह विलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्‍यक आहे. यासाठी ग्रामपंचायत पातळीवर ग्रामस्तरीय समिती तर नगरपालिकर, नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात वार्ड किंवा प्रभाग समितीवर सोपविण्यात आली आहे.

गावचे सरपंच हे ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष असून, तलाठी सहअध्यक्ष असणार आहेत. याशिवाय ग्रामसेवक, विकास सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, महिला बचतगट ग्रामसंघ अध्यक्ष, महिला बचत गटाचे सचिव, ग्रामपंचायत सदस्य, पोलिसपाटील या समितीत असतील. वॉर्ड, प्रभाग समितीमध्ये नगराध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि मुख्याधिकारी सचिव म्हणून काम पाहतील तर आरोग्य सभापती, बांधकाम सभापती, शिक्षण सभापती व सर्व नगरसेवक हे समितीचे सदस्य असतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.


इतर बातम्या
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात कृषी...औरंगाबाद : मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा...परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....