Agriculture Agricultural News heavy rain in Mumbai Thane | Agrowon

मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 जुलै 2020

मुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला. मुंबईतील काही ठिकाणी पावसाने पाणी साचले होते. 

मुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला. मुंबईतील काही ठिकाणी पावसाने पाणी साचले होते. 

मुंबईतील पूर्व उपनगरात जोरदार पाऊस झाला. मुलूंड ते सायन परिसरातही मुसळधार पाऊस झाला. जवळपास तीन तास झालेल्या पावसाने चेंबूरकर हैराण झाले. चेंबूरच्या पोस्टल कॉलनी परिसरात मनपाचे बुस्टर पंप सुरू असूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. चेंबूरमधील पोस्टल कॉलनीत तीन फूट पाणी साचले. मुंबई उपनगरातील मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. 

ठाण्यात कमी जास्त प्रमाणात पावसाचा जोर कायम होता. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असून, हवेत गारवा जाणवत आहे. ठाण्यात शनिवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ठाण्यातील तलवार पाली येथील नौका विहार या ठिकाणच्या रस्त्यावर पार्क करुन ठेवलेल्या तीन चारचाकी गाड्यांवर झाड पडले. यात गाड्यांचे मोठे नुकसान झाले. वसई, विरार, नालासोपाऱ्यातही पाऊस सुरू होता. रिमझिम पाऊसासह अधूनमधून जोरदार सरी बरसत होत्या. दोन दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे नागरिकांसह शेतकरीही सुखावले आहेत. वसई तालुक्यात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

अंबरनाथ तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागात पावसाचा जोर कायम होता. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले. शहापूरमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. यानंतर भात लागवडीच्या कामांना सुरुवात झाली आहे. बदलापूरमध्ये रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग सुरू होती. बदलापुरातील सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. 

पालघर जिल्ह्यात वसई येथे १२२.४३, जव्हार येथे ८१.६७, विक्रमगड येथे ९७.०, मोखाडा येथे ४४.४, वाडा येथे ८५.०, डहाणू येथे ८३.५२, पालघर येथे १२२.४३, तर तलासरीत ७८.५ मिमी पावसाची नोंद झाली.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
नांदेडमध्ये हळद ४९०० ते ५७०० रूपये...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...