निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात २७ हजारांवर घरांचे नुकसान

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात दापोली, मंडणगड, गुहागर भागात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २७,७८२ घरांची पडझड झाली आहे.
चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात घरांचे मोठे नुकसान झाले
चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात घरांचे मोठे नुकसान झाले

रत्नागिरी  : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात दापोली, मंडणगड, गुहागर भागात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २७,७८२ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये मंडणगडमध्ये ८ हजार तर दापोलीमधील १८ हजार घरांचा समावेश आहे. तसेच एक लाख ८० हजार घरांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाने तत्काळ अन्नधान्य पुरवठा करण्याची तयारी केली आहे.

शुक्रवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५७.३३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगडमध्ये ६२, दापोलीमध्ये १२४, खेडमध्ये १७, गुहागरमध्ये ५७, चिपळूणमध्ये ३८, संगमेश्वरमध्ये ११२, रत्नागिरीमध्ये ३३, लांजा येथे ५७, राजापूरात १६ मिमी पाऊस झाला. निसर्ग चक्रीवादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे त्यापासून काही अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्यांना जबरदस्त तडाखा बसला. मंडणगड तालुक्यात घरांचे मोठे नुकसान झाले. खाडी पट्ट्यातील गावांना याचा मोठा फटका बसला. पूर्ण गावच चक्रीवादळामुळे कोसळले. गावात असे एकही घर नाही ज्या घरावर छप्पर आहे. सिमेंटच्या पत्र्याचे संपूर्ण छप्पर हवेत उडून गेले.

किंजळघर, आंबवणे बु , शिगवण,  आंबडवे,  घोसाळे पनदेरी,  उंबरशेत, पेवेकोंड, वेळास, बाणकोट, वाल्मिकीनगर व तालुक्यातील उर्वरित सर्व गावे ही उध्वस्त झाली आहेत. आंबवणे बु. गावात अद्यापही कोणाचा संपर्क झाला नाही. सावित्री खाडीच्या टोकाला रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटचे गाव पूर्णतः उध्वस्त झालं आहे. दिवसभरात गावातील बऱ्यापैकी घरांची डागडुजी सुरु झाली. तयार झालेल्या एका घरात ४ ते ५ कुटुंबे एकमेकांच्या आधाराने राहत आहे. या सर्वांना अन्न, वस्त्र निवाऱ्याची गरज आहे. दापोली तालुक्यातील केळशी गावातील बापू आळी या एका भागात तीन दिवसानंतर संपर्क होऊ शकला आहे. अजूनही काही गावे संपर्कात नाहीत. कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.  महावितरणला फटका चक्रीवादळामुळे दापोली, मंडणगड, गुहागरमधील वीजपुरवठा पूर्णतः खंडित होता. चौदा सबस्टेशन, १९६२ ट्रान्सफॉर्मर, सव्वातीन हजार विजेचे खांब आणि काही किलोमीटर वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. वादळानंतर तत्काळ दुरुस्तीची कार्यवाही सुरु केली असून शुंगारतळीतील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे; मात्र दापोली, मंडणगडातील ३० गावातील पुरवठा पूर्णतः बंद आहे. वीजपुरवठा सुरु होण्यासाठी किमान तीन दिवस लागतील. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे अधीक्षक अभियंता डी. टी. सायनेकर यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com