खातेवाटप लवकरच  ः जयंत पाटील

मंत्री जयंत पाटील
मंत्री जयंत पाटील

मुंबई  ः गुरुवारी (आज) किंवा शुक्रवारी (उद्या) खातेवाटप होईल. खातेवाटपात काहीही अडचण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच खातेवाटप जाहीर करतील. विरोधी पक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

अर्थमंत्री पाटील यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांना सध्या दुसरे काहीही काम नाही. त्यातच त्यांच्या मनासारखे काही होत नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची मनःस्थिती समजू शकतो, अशी टीका श्री. पाटील यांनी केली; 

खातेवाटपासंदर्भात आघाडीच्या तिन्ही पक्षांची महत्त्वाची बैठक झाली. यानंतर मंत्री पाटील यांनी खातेवाटपावरही भाष्य केले. ते म्हणाले, की खातेवाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. गुरुवारी किंवा शुक्रवारी खातेवाटप होईल. कोणत्याही पक्षात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी नाही. अशी नाराजी असल्यास तिन्ही पक्ष ती नाराजी दूर करण्यास सक्षम आहेत.

वस्तू आणि सेवा कराविषयी (जीएसटी)देखील बैठक झाल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. जीएसटीचे उत्पन्न घटल्याने केंद्राकडून अपेक्षित निधी येत नाही; तसेच पीएमसी बँकेचे विलीनीकरण राज्य सहकारी बँकेत करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की मंत्रिमंडळ तयार होते आणि त्यानंतर खातेवाटप होते. मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर पुढील दोन ते ३ दिवसांमध्ये खातेवाटप होते. आमदार प्रणिती शिंदे या चांगल्या काम करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात असावे, असे आम्हाला वाटत होते, पण ते होऊ शकले नाही. त्यामुळे थोडीशी नाराजी आहे. खातेवाटप करताना काही बदल अपरिहार्य असतो; पण काँग्रेसमुळे खातेवाटप करण्यात उशीर झालेला नाही.

राज्यात महसूल कसा वाढेल, या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारच्या खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com