Agriculture Agricultural News Jitendra awahad selected as a parent minister Solapur Maharashtra | Agrowon

सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डॉ. जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे स्वतःच या जबाबदारीसाठी इच्छूक नसल्याचे सांगितले जात होते. पण मंगळवारी अचानकपणे श्री. वळसे पाटील यांच्याकडील पदभार काढून श्री. आव्हाड यांच्याकडे देण्यात आला.

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डॉ. जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे स्वतःच या जबाबदारीसाठी इच्छूक नसल्याचे सांगितले जात होते. पण मंगळवारी अचानकपणे श्री. वळसे पाटील यांच्याकडील पदभार काढून श्री. आव्हाड यांच्याकडे देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने भाजपमध्ये प्रवेश करुन राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची बरीच पडझाड झाली. त्यामुळे कामगारमंत्री वळसे पाटील यांच्या रुपाने पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यावर त्यांचे विशेष लक्ष राहिल, या हेतुने वळसे पाटील यांच्याकडे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली.

पण स्वतः वळसे पाटीलच ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हते. पण त्यांना राजी करण्यात आले, त्यानंतर एक-दोन आढावा बैठका घेऊन त्यांनी कामकाज सुरु केले. पण म्हणावे तसे लक्ष ते जिल्ह्याकडे देऊ शकले नाहीत. सध्या ‘कोरोना’चे संकट सगळीकडे घोंघावत आहे. पण वळसे पाटील या सगळ्यात कोठेच दिसले नाहीत, याबाबतची नाराजीही काहींनी पक्षनेतृत्वाकडे व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. पण आता अचानकपणे त्यांच्याकडील पदभार बदलून श्री. आव्हाड यांच्याकडे दिल्याने नेमक्या कोणत्या कारणाने हे घडले याची चर्चा सध्या सुरु आहे.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...