सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये उद्यापासून कडक लॉकडाउन 

गुरुवार (ता.१६) ते गुरुवार (ता.२६) या कालावधीत सोलापूर महापालिका हद्दीसह शेजारच्या ज्या गावांमध्ये ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत आहे अशा गावांमध्ये कडक लॉकडाउन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील गावांमध्ये वाढत असलेला ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अखेर लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. गुरुवार (ता.१६) ते गुरुवार (ता.२६) या कालावधीत सोलापूर महापालिका हद्दीसह शेजारच्या ज्या गावांमध्ये ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत आहे अशा गावांमध्ये कडक लॉकडाउन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

अवघ्या तीन महिन्यांमध्ये सोलापुरातील ‘कोरोना’चा प्रादुर्भाव हाताबाहेर गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांपार असून ३२८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनलॉक केल्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने सोलापुरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन करावा, असा प्रस्ताव तयार केला होता. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी लॉकडाउनबाबतचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली होती.

या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या विभागांची स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आणि महापालिकेच्या गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत चर्चेअंती लॉकडाऊनच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.    शेजारील गावांमध्येही लॅाकडाऊन  सोलापूर शेजारी असलेल्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या तालुक्यांतील काही गावांमध्येही लॅाकडाउन केला जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com