Agriculture Agricultural News lock down continue in state Mumbai Maharashtra | Agrowon

राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

मुंबई   ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनची मुदत आज (ता. ३०) संपत असताना राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा ३१ जुलैपर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन राहणार असून, यादरम्यान अनेक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहेत.

मुंबई   ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनची मुदत आज (ता. ३०) संपत असताना राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा ३१ जुलैपर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन राहणार असून, यादरम्यान अनेक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहेत.

‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यात आधीपासून लागू असलेले बहुतेक नियम कायम राहणार आहेत. राज्यात लॉकडाउनदरम्यान जिल्हाबंदी राहणार आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागांत प्रवास करण्याची मुभा कायम ठेवण्यात आली असली, तरी खरेदी किंवा अन्य अनावश्यक कामासाठी लांबचा प्रवास करण्यास मनाई असेल. राज्यात एसटीची मर्यादित सेवा सुरू राहील.

लॉकडाउनची मुदत आज (ता. ३०) संपत असताना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सोमवारी ‘मिशन बिगिन अगेन २’अंतर्गत नवा आदेश जारी केला. या आदेशानुसार १ जूनपासून देण्यात आलेल्या सवलती कायम ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय एखाद्या ठिकाणी परिस्थिती पाहून बिगर जीवनावश्यक सेवा सुरू ठेवायची की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि संबंधित महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेसह मुंबई प्रदेश, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते ५ या दरम्यान सुरू राहतील, असे आदेशात म्हटले आहे. नव्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेली पान, तंबाखू विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. रिक्षा, टॅक्सी आणि दुचाकीला पूर्वीप्रमाणेच नियम लागू राहतील, असे आदेशात म्हटले आहे.
 
अशी आहे नियमावली

  •  सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वावर आवश्यक, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर राखणे बंधनकारक.
  • दुकानांत ग्राहकांमध्ये योग्य अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. एकाचवेळी पाचपेक्षा जास्त ग्राहकांना परवानगी नाही.
  • लोकांना मोठया संख्येने एकत्र जमता येणार नाही. लग्नसमारंभाला परवानगी. पण वऱ्हाडी मंडळींची संख्या ५० पेक्षा जास्त नसावी.
  • अंत्यविधीवेळी ५०पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई
  • सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान आणि तंबाखू खाण्यास मनाई आहे.
  • कामाच्या ठिकाणी प्रवेशव्दारावर आणि बाहेर निघण्याच्या मार्गावर थर्मल स्क्रिनिंग करावे लागेल. तसेच हॅण्डवॉश, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक.
  • कामाच्या ठिकाणी मानवी संपर्क येणाऱ्या प्रत्येक ठिकाणाची सतत स्वच्छता करावी लागेल.
  • कर्मचाऱ्यांच्या शिफ्टच्या वेळा तसेच कामावर असताना कर्मचाऱ्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्याची जबाबदारी प्रमुखांची राहिल.

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...