`तुम्ही घरी थांबा,आम्ही अखंडित वीजपुरवठा करू`

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लाॅकडाऊन करण्यात आले असतानाही या काळातही महावितरणची यंत्रणा अखंडित वीज पुरवठ्यासाठी सज्ज आहे. आरोग्याची योग्य काळजी घेऊन अभियंते व कर्मचारी अखंडित वीजपुरवठ्याला प्राधान्य देत आहेत. तुम्ही घरी थांबा, आम्ही अखंडित वीजपुरवठा करू, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
संग्रहित छायाचित्र

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महावितरणकडून विविध उपाययोजनांसह वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांनी वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी किंवा अन्य सेवांसाठी शक्यतो  महावितरण कार्यालयात येऊ नये. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास किंवा अन्य महत्वाची तक्रार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ, ॲप्सचा वापर करावा. तसेच महावितरणच्या   १८००१०२३४३५  किंवा  १८००२३३३४३५  किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महावितरण  नाशिक परिमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com