‘येळकोट येळकोट जय मल्‍हार’च्‍या गजरात माळेगाव यात्रेला सुरुवात

माळेगाव यात्रेला प्रारंभ
माळेगाव यात्रेला प्रारंभ

श्रीक्षेत्र माळेगाव, जि. नांदेड ः दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्‍या श्रीक्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथील श्री खंडोबा यात्रेचा मंगळवारी (ता. २४) प्रारंभ झाला. दुपारी दोन वाजता श्री खंडोबाची देवस्‍वारी निघाली. ‘येळकोट येळकोट जय मल्‍हार’च्‍या गजरात बेल, भंडारा, खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्‍वारीचे दर्शन घेतले.

मुख्‍य रस्‍त्‍याने निघालेल्या देवस्वारीचे आगमन शासकीय विश्रामगृहाजवळ झाले. त्या वेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शांताबाई पवार-जवळगावकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, मोहनराव हंबर्डे, आशाताई शिंदे, उपाध्‍यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती समाधान जाधव, शिक्षण व आरोग्‍य सभापती माधवराव मिसाळे, कृषी व पशुसंर्धन सभापती दत्‍तात्रय रेड्डी, महिला व बालकल्‍याण सभापती मधुमती राजेशराव देशमुख, समाजकल्‍याण सभापती शीलाताई दिनेश निखाते, मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही. आर. कोंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

माळेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्‍हा परिषद व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारराव नाईक (रिसनगाव), नागेश गोविंदराव महाजन (कुरुळा), व्‍यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशालराव भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी) यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्‍यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com