नगर जिल्ह्यात शिवभोजन योजनेत गैरप्रकार ः आमदार संग्राम जगताप

नगर ः सरकारने अल्प दरात गरजूंसाठी शिवभोजन योजना आणली. लॉकडाउनच्या काळात कोणीही गरजू उपाशीपोटी राहू नये, यासाठी पुरवठा विभागातर्फे धान्यवितरण सुरू केले आहे. मात्र, शिवभोजन योजनेत केवळ २५ लोकांना जेवण देऊन शिवपंगत संपल्याचा डांगोरा केंद्रचालक पिटतात. उर्वरित गरजूंच्या नावाखाली डुप्लिकेट फोटो अपलोड करतात. त्यामुळे बहुतांश गरजू अन्नापासून वंचित राहत आहेत. तसेच, धान्यवितरणासाठी दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा आदेश दिलेला असताना, फक्त दोन तास दुकाने सुरू ठेवून लोकांना नादी लावण्याचा प्रकार सुरू आहे. अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून, या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी वरिष्ठ पातळीवर करणार असल्याचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
संग्रहित छायाचित्र

श्री. जगताप म्हणाले, की शिवभोजन योजनेतून जास्तीत जास्त गरजूंना अन्न मिळावे, यासाठी शिवथाळ्या वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. जिल्ह्यात बहुतांश तालुक्‍यांत शिवभोजन योजना सुरू केली. उर्वरित तालुक्‍यांतही कार्यारंभ आदेश दिले आहेत. मात्र, लॉकडाउनच्या काळात काही केंद्रचालक गैरफायदा घेऊन, गरजूंना उपाशी मारून आपली पोळी भाजण्याचा उद्योग करीत आहेत. काही केंद्रांना १५० ते २०० थाळ्यांसाठी परवानगी असताना, २५ गरजूंना अन्न दिल्यावर उर्वरित थाळ्यांचे डुप्लिकेट फोटो अपलोड करून त्याचा पैसा लुबाडत आहेत. स्वस्त धान्य दुकानांतून होणाऱ्या धान्यवितरणातही मोठा गफला सुरू आहे. दुकानदारांना आठ तास दुकाने उघडी ठेवण्याचा आदेश असताना, दोन तासांत ती बंद केली जातात. गरजूंना धान्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्याला पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांची साथ आहे.

श्री. जगताप म्हणाले, की लॉकडाउनमध्ये गरजूंना अन्नधान्य मिळावे, यासाठी सरकारने तीन महिन्यांसाठी अन्नधान्य उपलब्ध करून दिले. धान्य नेणारा ट्रक नुकताच संगमनेर येथे पकडला. त्यात अधिकाऱ्यांची चौकशी होण्याऐवजी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला. जिल्ह्यात नेमके काय चाललेय, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील अनागोंदी कारभाराविषयी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना सर्व माहिती दिली आहे. त्यांनी सचिवांना चौकशीच्या सूचना देण्यास सांगितले आहे. तसेच, आपणही वरिष्ठ पातळीवर पुराव्यानिशी तक्रार करणार आहोत, असे श्री. जगताप म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com